करण जोहरची ऑफर विजय देवराकोंडाने नाकारली


करण जोहरची चक्क ४० कोटी रुपयांची ऑफर दाक्षिणात्य अभिनेता विजय देवराकोंडाने नाकारली आहे. दक्षिणेत त्याचा ‘डियर कॉम्रेड’ हा चित्रपट सध्या खूप गाजतो आहे. करण जोहरने तो पाहिल्यानंतर याचा हिंदीत रिमेक करण्याची कल्पना केली होती. विजयने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारावी अशी इच्छाही करणची होती. पण, विजयने त्याला नकार दिला आहे.

विजय देवराकोंडाने ‘अर्जुन रेड्डी’ या तेलुगु चित्रपटात भूमिका केली होती. तो चित्रपट खूप गाजला. हिंदीत त्याचाच ‘कबीर सिंह’ हा रिमेक झाला, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. करणने या पार्श्वभूमीवर विजयचा ‘डियर कॉम्रेड’ हिंदीत करण्याचा निर्णय घेतला होता.

विजय याबद्दल बोलताना एका मुलाखतीत म्हणाला, हिंदी चित्रपट करणे रंजक आहे. पण, हिंदी आणि तेलुगुत मला असे काही तरी करायचे आहे. स्वतःला अपार्टमेंटमध्ये शिफ्ट होताना मला पाहायचे नाही. आळशी जीवनशैली मला आवडते. रोज पाच लोकांसोबत मी काम करु शकत नाही. यातून कदाचित सर्व उद्देश पूर्ण होत असतील, परंतु हे मला आवडणारे नाही. मला वाटते माझ्यासाठी मुंबई खूपच वेगवान आहे. माझ्या अटींवर काम करणे मला पसंत आहे.

Leave a Comment