‘जबरिया जोडी’मधील भावनिक गाणे तुमच्या भेटीला


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला परिणीती चोप्रा आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांची ‘जबरिया जोडी’ येणार आहे. काही दिवसांपूर्वीच बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित त्यांच्या या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. यानंतर चित्रपटातील काही गाणीही रिलीज करण्यात आली. प्रेक्षकांच्या पसंतीसही ही गाणी उतरली.

या चित्रपटातील आणखी एक भावनिक गाणे आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे शीर्षक ‘ख्वाब फरोशी’ असे असून परिणीतीने हे गाणे तुटलेल्या मनांसाठीचे भावनिक गाणे रिलीज, असे कॅप्शन देत शेअर केले आहे. सिद्धार्थने नात्यात आलेल्या दुराव्यानंतर उचलेले पाऊल आणि दोघांच्या मनाची होणारी घालमेल या गाण्यात पाहायला मिळते.

सचेत टंडन आणि परंपरा ठाकूर यांनी गाण्याला आवाज दिला आहे. तर या गाण्याचे बोल सिद्धार्थ आणि गरिमा यांनी लिहिले आहेत. दरम्यान सिद्धार्थ परिणीतीशिवाय या चित्रपटात अपारशक्ती खुराणा, संजय मिश्रा, जावेद जाफरी, चंदन रॉय आणि गोपाल दत्त यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. प्रशांत सिंग यांचे दिग्दर्शन असलेला हा चित्रपट ९ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

Leave a Comment