
‘दिल चाहता है’ या चित्रपटात बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि ‘नवाब’ सैफ अली खान या दोघांनी शेअर केली होती. त्यानंतर हे दोघे एकत्र परत कधीच मोठ्या पडद्यावर दिसले नाही. आता या दोघांच्या चाहत्यांसाठी गूड न्युज आहे. कारण हे दोघे आता पुन्हा एकदा स्क्रिन शेअर करणार आहेत. ते पण एका चित्रपटाच्या रिमेकमध्ये…
‘या’ रिमेकमध्ये स्क्रिन शेअर करणार सैफ अली आणि आमिर खान
लवकरच दाक्षिणात्य सिनेसृष्टीत सुपरहिट ठरलेल्या ‘विक्रम वेदा’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक तयार करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक राजा विक्रमादित्या आणि वेताळ यांच्या कथेवरुन तयार करण्यात आले आहे. विक्रम हे एक पोलिसाचे पात्र या चित्रपटात आहे. तर एका गुन्हेगाराचे वेदा हे पात्र आहे. या चित्रपटात विक्रम वेताळ प्रमाणेच पोलिस आणि एका गुन्हेगाराची कथा सांगण्यात आली होती. याच चित्रपटाचा आता हिंदी रिमेक तयार करण्यात येणार आहे.
यासंदर्भात एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, आमिर खान हा हिंदी रिमेकमध्ये गुन्हेगाराच्या भूमिकेत तर सैफ हा पोलिसाच्या भूमिकेत झळकणार आहे. मुळ चित्रपटात आर. माधवनने ही भूमिका साकारली होती. तर, विजय सेथीपतीने ‘वेदा’चे पात्र साकारले होते. या हिंदी रिमेकचे दिग्दर्शन पुष्कर – गायत्री हे करणार आहेत. तमिळ चित्रपटाचेही दिग्दर्शन त्यांनीच केले होते. सध्या या चित्रपटाच्या कथानकावर काम सुरू आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी मार्च महिन्यात प्रदर्शित होईल.
