रो’हिट’ शर्मा नवा ‘सिक्सर किंग’


फ्लोरिडा – आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर रोहित शर्मा हा अव्वल स्थानी पोहचला आहे. वेस्ट इंडिज विरुध्दच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात खेळताना रोहितने व्यक्तिगत दुसरा षटकार लगावला आणि त्याने वेस्ट इंडिजच्या धाकड फलंदाज ख्रिस गेलचा विक्रम मोडीत काढत ‘सिक्सर किंग’ बनला.

५८ सामन्यात ख्रिस गेलने १०५ षटकार ठोकले असून गेलला रोहित शर्माने मागे टाकले आहे. रोहितने ९६ टी-२० सामन्यात खेळताना १०५ षटकाराचा आकडा पार केला आहे. रोहित शर्मा आणि गेल नंतर न्यूझीलंडचा मार्टिन गुप्टीलने १०० सामन्यात १०३ षटकार लगावले आहेत.

Leave a Comment