अखेर तुमच्या भेटीला आलेच ‘छिछोरे’


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला श्रद्धा कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यांची मुख्य भूमिका असलेला ‘छिछोरे’ हा चित्रपट येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. मैत्रीदिनानिमित्त रिलीज करण्यात आलेल्या या ट्रेलरमध्ये घट्ट मैत्रीची झलक पाहायला मिळते.

या ट्रेलरमध्ये आयुष्यात येणारे निरनिराळ्या प्रकारचे आणि निरनिराळ्या स्वभावाचे लोक अनोळखी म्हणून आयुष्यात येतात आणि नंतर आयुष्य बनून जातात, याचीच झलक पाहायला मिळते. त्याचबरोबर ट्रेलरमध्ये कॉलेजपासून सुरू झालेल्या या मैत्रीचा कधीही न संपणारा प्रवास, त्यात येणारे अनेक अडथळे, भावनिक क्षण आणि मित्रांची धमाल मस्ती दिसते.

प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन श्रद्धा आणि सुशांतचा हा चित्रपट करेल, असेच काहीसे ट्रेलर पाहून तरी वाटते. कॉलेज आणि हॉस्टेल लाईफ जगलेल्या प्रत्येकाला आपल्या आयुष्यातील त्या खास दिवसांची आठवण करून देणारा हा चित्रपट ३० ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले आहे.

Leave a Comment