दिसते तसे नसते याचा प्रत्यय अनेकदा एखाद्या गोष्टीकडे पाहताना येतो. म्हणजेच एकच गोष्ट दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिल्यास तिच्यामधून वेगळा अर्थ निघू शकतो. या ऑप्टीकल इल्यूजनमुळे अनेकदा गोंधळ उडतो. अशाच एका फोटोची सध्या इंटरनेटवर चर्चा सुरु आहे. सध्या नेटकरी एक फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट आहे की रंगीत? यावरुन चर्चा करत आहेत. हा फोटो रंगीत असल्याचे अनेकांनी म्हटले आहे तर हा फोटो ब्लॅक अँड व्हाइट असल्याचे मत बऱ्याच जणांनी व्यक्त केले आहे.
This is a black and white photograph. Only the lines have colour.
What you “see” is what your 🧠 predicts the reality to be, given the imperfect information it gets. pic.twitter.com/gwttlcC2Zw
— Lionel Page (@page_eco) July 27, 2019
जवळपास पाचशे लोकांनी कमेंट करुन लिओनल पेज या अर्थतज्ज्ञाने ट्विट केलेल्या फोटोवर आपले मत नोंदवले आहे. हा फोटो १८ हजारहून अधिक जणांनी रिट्विट केला असून मागील पाच दिवसांमध्ये ३८ हजारहून अधिक जणांनी हा फोटो लाइक केला आहे. हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट असून त्यावर केवळ रंगीत बॉक्स काढले असल्याचे मुळात फोटो शेअर करताना पेज यांनी म्हटले आहे. हा ब्लॅक अॅण्ड व्हाइट फोटो असून यावरील रेषा रंगीत आहेत. जे तुम्ही पाहता तेच तुमच्या मेंदूला खरे वाटते, असे पेज यांनी हा फोटो शेअर करताना म्हटले आहे.
नेटकऱ्यांची या फोटो खाली चांगलीच चर्चा रंगल्या असून हा फोटो खरच भन्नाट असल्याचे अनेकांनी म्हटले आहे. तर हा फोटो रंगीतच असल्याचे मत काहींनी मांडत खूप सारे फोटोशॉप करुन एकाच वेळी हा फोटो ब्लॅक अॅण्ड व्हाइट आणि रंगीत असल्याचे भासवले जात असल्याचे म्हटले आहे.