सोशल मीडियात व्हायरल होत आहे त्या समलैंगिक तरुणींची लव्हस्टोरी


सध्या सोशल मीडियावर पाकिस्तानमधली कलाकार सुंदास मलिक आणि भारतातील एक हिंदू मुलगी अंजली चक्रा या समलिंगी जोडीचे फोटो चर्चेत आहेत.


आपल्या आपल्या हँडलवरून ‘अ न्यूयॉर्क लव्ह स्टोरी’ या कॅप्शनखाली @Sarowarrrr या नावाच्या छायाचित्रकाराने काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दिसणारी एक मुलगी अंजली चक्रा ही भारतीय वंशाची असून दुसरी सुंदास मलिक ही पाकिस्तानी वंशाची आहे. गेले वर्षभर या दोघीही रिलेशनशिपमध्ये असल्याची माहितीही समोर आली आहे. काही फोटोज शेअर करून त्यांनी आपल्या रिलेशनशिपबद्दल सांगितलं आहे.


दरम्यान, त्यांच्या फोटोवरून प्रेमाला कोणत्याही जात, धर्माचे बंधन नसते हे दिसून येते. सुंदास मलिक एक कलाकार असून एक वर्ष त्यांच्या रिलेशनशिपला झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर त्यांनी आपले काही फोटोज शेअर केले. तसेच त्यांनी आपल्या रिलेशनशिपला एक वर्ष झाल्याचे सेलिब्रेशनही केले होते. सोशल मीडियावर सध्या त्यांनी शेअर केलेले फोटोज हे चर्चेचा विषय बनत आहेत.

Leave a Comment