ही अभिनेत्री एका खास व्यक्तिसाठी चोरायची हॉटेलमधील शॅम्पूच्या बॉटल…


बॉलीवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये डिंपल गर्ल दीपिका पादुकोणचा समावेश आहे. अपार मेहनतीच्या जीवावर तिने बॉलीवूडमध्ये आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. पण आपल्या वैयक्तिक जीवनात दीपिका नक्की कशी आहे ? हे जाणून घ्यायला उत्सूक असणा-या चाहत्यांना दीपिकाची खास मैत्रिण स्रेहा रामचंदर हिने तिला एक मोठे सरप्राईज दिले आहे. स्रेहाने दीपिकाबद्दलच्या काही खास गोष्टी फ्रेन्डशिप डे आधी शेअर केल्या आहेत. एक वेगळी दीपिका तुम्हाला त्या वाचून भेटेल.

ही नोट स्नेहाने दीपिकाच्या वेबसाईटवर शेअर केली आहे. दीपिका अशी एक व्यक्ति आहे, मी तासन् तास जिच्यासोबत गप्पा मारू शकते. केवळ प्रेम तिच्या डोळ्यांत दिसते. ती यावरून तुम्हाला किती जपते, हे कळते. माझ्यासाठी हॉटेलमधील शॅम्पूच्या छोट्या छोट्या बॉटल ती चोरायची. जेव्हा केव्हा ती फिरायला जायची, तेव्हा ती असे करायची. कारण या बॉटल मला आवडतात, हे तिला चांगलेच ठाऊक होते. मी दीपिकावर जीवापाड प्रेम करते. मी नशीबवान आहे की, माझ्यासोबत तू आहेस, असे स्रेहाने म्हटले आहे.

View this post on Instagram

#nocaption #justpose @albertaferretti

A post shared by Deepika Padukone (@deepikapadukone) on


दर महिन्याला तिची एक जवळची व्यक्ति दीपिकाच्या वेबसाईटवर तिच्याबद्दल काहीतरी लिहिते. दिग्दर्शक इम्तियाज अलीने यापूर्वी दीपिकाबद्दल एक पोस्ट लिहिली होती. तिने त्यादिवशी माझ्याकडे पाहिले. पाहताक्षणीच मी तिला ओळखले. तिच्या डोळ्यांनीही हाच तो दिग्दर्शक, हे ओळखले होते. ती जणू सगळे जाणते, तिच्या बोलक्या डोळ्यांत हे दिसत होते. दीपिकाला भेटायला मी गेलो, तिचा एकही चित्रपट तोपर्यंत रिलीज झालेला नव्हता. ‘रॉकस्टार’साठी मी तिला घेऊ इच्छित होतो. पण हा चित्रपट अनेक वर्ष रखडल्यामुळे एका दुसऱ्या चित्रपटात मी तिला घेतल्याचे इम्तियाज अलीने लिहिले होते.


सध्या ‘छपाक’ या चित्रपटात दीपिका व्यस्त आहे. दीपिका मेघना गुलजार दिग्दर्शित या चित्रपटात अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवालची भूमिका साकारताना दिसणार आहे.

Leave a Comment