
मुंबई – चंदीगढ संघाला तब्बल चाळीस वर्षानंतर रणजी क्रिकेटमध्ये खेळता येणार आहे. बीसीसीआयने या संघाला मान्यता दिली असल्याचे यूटीसीएचे अध्यक्ष संजय टंडन यांनी सांगितले आहे.
या नवोदित संघाचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण
टंडन म्हणाले, चंदीगढ क्रिकेटला मान्यता बीसीसीआयच्या बैठकीत देण्याबाबत म्हटले गेले आहे. मला दिलेल्या माहितीनुसार, चंदीगढचा क्रिकेटचा दर्जा प्राप्त असलेल्या राज्यांमध्ये समावेश केला गेला आहे. १९८२ मध्ये यूटीसीएला नोंदणीकृत केले गेले होते. याआधी पंजाब आणि हरियाणा यांना एक संस्था करण्यास बीसीसीआयने सांगितले होते.
पंजाबने या प्रकरणावर सहमती दर्शवली होती, पण याला हरियाणाने आपला नकार कळवला होता. या निर्णयानंतर, चंदीगढच्या खेळाडूंना बीसीसीआयच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता येणार आहे. त्यांना आधी पंजाब आणि हरियाणाकडून खेळावे लागत होते.
