
नवी दिल्ली – व्हॉट्सअॅपचा वापर मोबाईल आणि इंटरनेटशिवाय कधी करता येईल का याची कधी कल्पनाही तुम्ही केली नसेल. पण आता एक खास फीचर व्हॉट्सअॅपची मालकी असलेल्या फेसबुक वापरकर्त्यांना देणार आहे. त्यामध्ये फोनला न जोडता डेस्कटॉपवर चालणारे व्हॉट्सअॅप हे इंटरनेटशिवाय सुरू राहणार आहे.
फोनला न जोडता इंटरनेटविना सुरु राहणार तुमचे व्हॉट्सअॅप ?
२०१५ मध्ये व्हॉट्सअॅपने वेब व्हर्जन सुरू केले. मोबाईल अॅपसारखे ते काम करते. पण त्यासाठी फोनचे इंटरनेट जोडणे आवश्यक आहे. फेसबुक ही युनिव्हर्सल विंडोज प्लॅटफॉर्म (यूडब्ल्यूपी) विकसित करत असल्याचे ट्विट वॅबइटालइन्फोने केले आहे. फोन बंद असला तरी या तंत्रज्ञानामुळे व्हॉट्सअॅपला विविध माध्यमे जोडणे शक्य होणार आहेत. त्याचबरोबर विविध साधनांवर (डिव्हाईस) एकाच व्हॉट्सअॅप अकाउंटचा वापर करण्यावर फेसबुक कंपनी काम करत आहे.
