‘ती’ दोन केळी पंचतारांकित हॉटेलला पडली 25 हजारांना


गेल्या काही दिवसांपासून अभिनेता राहूल बोस आपल्या कोणत्या चित्रपटामुळे नाही तर 442 रुपयांच्या केळीमुळे चर्चेत आला आहे. त्याने चंदीगडच्या एका पंचतारांकित हॉटेलामध्ये दोन केळी मागवली होती आणि या हॉटेलने त्या दोन केळ्यांचे चक्क 442 रुपयांचे बिल फाडले.

राहूलने यानंतर या संपूर्ण प्रकरणाबद्दल माहिती देत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. जो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आणि याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली. उत्पादन शुल्क विभागाने या हॉटेलवर कारवाई करत आता २५ हजारांचा दंड ठोठावला आहे.

आपल्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी राहूल बोस सध्या चंदीगडमध्ये असून तो येथेच जेडब्ल्यू मॅरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्यास होता. या हॉटेलमधीलच आपला व्हिडिओ राहूलने शेअर केला होता. तो ज्यात येथील सर्व सोयी-सुविधांचे कौतुक करत होता. पण तो शेवटी या हॉटेलने २ केळ्याचे आकारलेले पैसे आणि यावर लावलेला जीएसटी बिलाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवत होता. याच व्हिडिओची दखल घेत हॉटेलवर कारवाई करण्यात आली.

Leave a Comment