
मँचेस्टर विमानतळावर, स्थानिक अधिकाऱ्यांकडून पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वासिम अक्रमला अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. आपल्या ट्विटर हँडलवरुन यासंदर्भात माहिती खुद्द अक्रमने दिली आहे. आपल्याशी विमानतळावरील अधिकाऱ्यांनी उद्धटपणे बोलत, वासिम अक्रमने माझ्याजवळील औषधांची योग्य काळजी घेतली नसल्याचा आरोप केला आहे.
मँचेस्टर विमानतळावर वासिम अक्रमला अपमानास्पद वागणूक
Very disheartened at Manchester airport today,I travel around the world with my insulin but never have I been made to feel embarrassed.I felt very humiliated as I was rudely questioned & ordered publicly to take my insulin out of its travel cold-case & dumped in to a plastic bag pic.twitter.com/UgW6z1rkkF
— Wasim Akram (@wasimakramlive) July 23, 2019
मधुमेहाच्या आजाराने वासिम अक्रम हा त्रस्त आहे. तो यासाठी डॉक्टरांनी दिलेली औषध नेहमी आपल्या जवळ बाळगतो. पण मँचेस्टर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी अक्रमशी उद्धटपणे बोलत त्याची औषधे त्याला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवण्यास सांगितले. हा प्रकार अपमानास्पद आपल्यासाठी असल्याचे अक्रमने म्हटले आहे.
वासिमला १९९७ सालपासून मधुमेहाचा त्रास असून वासिम अक्रम त्यावेळपासून आपल्याजवळ डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे आणि इंजेक्शन जवळ बाळगतो. दरम्यान विमानतळ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
