सर्वात श्रीमंत खेळाडूंच्या यादीत विराट कोहली या स्थानावर


हॉपरएचक्यू.कॉम (HopperHQ.com) या संकेतस्थळाने इंस्टाग्रामवरील सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी जाहीर केली असून या यादीत सर्वोत्तम १० जणांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने स्थान मिळवले आहे. विराट कोहली हा फुटबॉलपटूंचा भरणा असलेल्या या यादीत एकमेव क्रिकेटपटू आहे. या यादीमध्ये विराटने ९ वे स्थान मिळवले आहे.

या यादीमध्ये पोर्तुगालचा फुटबॉलपटू ख्रिस्तीआनो रोनाल्डो पहिल्या स्थानावर आहे. ही यादी खेळाडूंचे सोशल मीडियावर चाहते आणि त्यांची कमाई या निकषावर जाहीर केली जाते. २०१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ पोहचला होता.

इन्स्टाग्रामवरील सर्वात श्रीमंत खेळाडूंची यादी –
१) ख्रिस्तीआनो रोनाल्डो
२) नेमार
३) लायोनल मेसी
४) डेव्हिड बॅकहॅम
५) लेब्रोन जेम्स
६) रोनाल्डिनो
७) गॅरेथ बेल
८) झ्लाटान इब्राहमोविच
९) विराट कोहली
१०) लुईस सुआरेझ

Leave a Comment