दो केले की कीमत तुम क्या जानो राहूल बाबू?


आपल्या विविध कामांसाठी हिंदीसिनेसृष्टीतील कलाकार देशभरातील म्हणा किंवा विदेशातील अनेक शहरांना भेटी देतच असतात. त्यातच ते आपल्या राहणीमानानुसार विविध शहरांमध्ये पंचतारांकित हॉटेलची निवड करतात. पंचतारांकित हॉटेलमधील सेवा ही कायम महागच असते, हे काही आपल्याला नवीन सांगयला नको. पण या महाग सेवेचा फटका अभिनेता राहुल बोस याला बसला आहे. राहुल बोसकडून चंदीगढमधील एका हॉटेलने दोन केळ्यांचे चक्क ४४२ रुपये बिल आकारल्याची माहिती राहुलने स्वतः सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करुन दिली आहे.

सध्या चंदीगढमध्ये राहुल बोसच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असल्यामुळे चंदीगढमधील जेडब्ल्यु मेरिएट या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहुल थांबला आहे. सकाळच्या वेळात राहुल या हॉटेलमध्ये वर्कआऊट करत असताना हॉटेलकडे त्याने नाश्तासाठी २ केळी मागविली होती. हॉटेलने या दोन केळ्यांसाठी आकारलेले बील पाहून राहुल देखील चक्रावून गेला. हॉटेलने राहुलला या दोन केळ्यांसाठी चक्क ४४२ रुपयांचे बील दिले.


ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती राहुलने शेअर केली आहे. राहुलने या व्हिडीओला यावर विश्वास ठेवण्यासाठी तुम्हाला आधी हे बील पाहावे लागेल. कोण म्हणते की फळ आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक नाहीत ? जे. डब्ल्यु.मॅरिएट चंदीगढमधील लोकांना एकदा विचारा, असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर राहुलचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पंचतारांकित हॉटेलमध्ये आकारण्यात येणाऱ्या किंमतींवर अनेक नेटकऱ्यांनी बोट ठेवले आहे. त्याच बरोबर अशा हॉटेलवर त्यांनी टीकादेखील केली आहे.

Leave a Comment