
नायजेरियाच्या लागोस शहरातील विमानतळावर टेकऑफसाठी तयार असणाऱ्या विमानाच्या पंख्यावर एक माणूस चढल्याने चांगलीच खळबळ उडाली. या व्यक्तीला नंतर विमानतळावरील अधिकाऱ्यांनी अटक केली. त्या व्यक्तीने असे का केले याबद्दल अद्याप माहिती मिळू शकलेली नाही.
विमान उडण्यास तयार असतानातच विमानाच्या पंख्यावर चढला माणूस
मुर्तला मुहम्मद आंतरराष्ट्रीय विमानतळावर अजमान एअर फ्लाइटचे एक विमान शुक्रवारी टेकऑफ घेण्यासाठी क्लीयरेंसची वाट बघत असताना, एक आदमी विमानाच्या पंख्यावर चढताना दिसला.
अजमान एअरने सांगितले की, अज्ञात व्यक्ती रनवेवर विमानाच्या दिशेने येत असल्याचे पाहून पायलटने इंजिनचा वेग कमी केला. मात्र तो व्यक्ती न थांबल्यावर पायलटने इंजिन बंद केले. इंजिन बंद केल्यानंतर त्या व्यक्तीने उडी मारत विमानाच्या पंख्यावर चढण्यास सुरूवात केली. तो व्यक्ती कॅबिनमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता.
https://www.instagram.com/p/B0F9w5qnNzc/?utm_source=ig_web_copy_link
पायलटने त्वरित याबाबतची माहिती रेडिओवर दिली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी तेथे पोहचत त्या व्यक्तीला ताब्यात घेतले. याच दरम्यान विमानातील एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून, त्याची चौकशी सुरू आहे.
