वडिलांप्रमाणे बॉलीवूडमध्ये नाव कमवू शकले नाहीत हे 6 अभिनेते


बॉलीवूडमध्ये आपल्या कॉमेडीच्या जोरावर स्वतःचे स्थान निर्माण करणारे अभिनेता महमूद अली यांची 23 जुलैला पुण्यतिथी आहे. महमूद यांनी बॉलीवूडच्या चित्रपटांमध्ये आपल्या कॉमिक टायमिंगच्या जोरावर नाव कमवले. मात्र महमूद यांच्याप्रमाणे त्यांचा मुलगा लकी अली सिनेमाजगतमध्ये नाव कमवू शकला नाही. जाणून घेऊया अशाच 6 अभिनेत्यांविषयी, ज्यांच्या वडिलांनी फिल्मसृष्टीमध्ये मोठे काम केले, मात्र त्यांची मुलं तेवढे नाव कमवू शकले नाहीत.

चित्रपट जगतातील कॉमेडी किंग महमूद यांचा मुलगा लकी अली खूप दिवसांपासून लाईमलाईटपासून दूर आहे. गायक आणि कंपोजर लकी अलीचे वडील महमूद यांना जेवढे यश मिळाले तेवढे त्याला मिळाले नाही. लकीने दुसरे लग्न इनायाशी केले आहे. इनाया आणि लकी यांना दोन मुलं आहेत. इनायाबरोबर घटस्पोटानंतर लकीने 2010 मध्ये 52 वर्षीय ब्रिटनची ब्युटी क्वीन केट एलिजाबेथ बरोबर लग्न केले. दोघांना एक मुलगा देखील आहे.

प्रसिध्द दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा मुलगा अरमान कोहली इंडस्ट्रीमध्ये वडिलांप्रमाणे नाव कमवू शकला नाही. अरमानने ‘बदले की आग’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र त्यानंतर आलेल्या ‘विरोधी’ हा चित्रपट जोरदार आपटला. त्यानंतर ‘दुश्मन जमाना’, ‘कोहरा’, ‘औलाद का दुश्मन’ या चित्रपटात तो दिसला. त्याचा शेवटचा चित्रपट सलमान खानचा प्रेम रतन धन पायो हा होता. चित्रपटापेक्षा अरमान आपल्या रागीट स्वभावासाठी चर्चेत असतो. बिग बॉस 7 मध्ये तनीशा मुखर्जीबरोबरी अफेअरच्या बऱ्याच चर्चा झाल्या होत्या.

राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर देखील वडिलांप्रमाणे नाव कमवू शकला नाही. आर्यने आपल्या करिअरची सुरूवात 2002 मध्ये आलेला ‘अब के बरस’ या चित्रपटातून केली होती. त्यानंतर ‘गुरू’, ‘जेल’, ‘तीस मार खां’, ‘डेंजरस इश्क’, ‘जोकर’, ‘बंगिस्तान’ सारख्या चित्रपटात तो दिसला. मात्र त्याला यश मिळाले नाही. आर्य बब्बर बिग बॉस 8 मध्ये देखील दिसला होता.

अभिनेता शेखर सुमनचा मुलगा अध्यन सुमनचे करिअर देखील फ्लॉप ठरले. त्याने 2008 मध्ये ‘हाल ए दिल’ चित्रपटातून करिअरला सुरूवात केली होती. मात्र लवकरच इंडस्ट्रीमधून तो गायब झाला. अध्ययनचे कंगनाबरोबरच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.

प्रोड्युसर वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी देखील फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमवू शकला नाही. 2009 मध्ये ‘कल किसने देखा’ मधून त्याने चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. आतापर्यंत त्याचा एकही चित्रपट हिट झालेला नाही.

अमजद खानचा मुलगा शादाब खानने ‘राजा की आएगी बारात’ या चित्रपटातून करिअरला सुरूवात केली होती. या चित्रपटात त्याच्या बरोबर राणी मुखर्जीने काम केले होते. मात्र शादाब वडिलांप्रमाणे नाव कमवू शकला नाही.

Leave a Comment