#नॉट माय दीपिका ट्रेंड होण्यामागे हे आहे कारण


सध्या ट्विटरवर दीपिकाचे चाहते मोठ्या प्रमाणात #नॉट माय दीपिका हा ट्रेंड चालवताना दिसत आहेत. दीपिकाने लव रंजन यांच्यासोबत काम करू नये, यासाठी हा ट्रेंड आहे. मीटू मोहिमेअंतर्गत दिग्दर्शक लव रंजन यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप केला गेला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री लव रंजनच्या घराबाहेर दीपिका आणि रणवीर स्पॉट झाल्यामुळे लव रंजनच्या आगामी चित्रपटात ही जोडी झळकणार असल्याचे वृत्त समोर येऊ लागल्यानंतर दीपिका आणि रणवीर पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्याची शक्यता माध्यमांतून वर्तण्यात आल्यानंतर नेटकऱ्यांनी दीपिकाला या चित्रपटात काम करण्यासाठी विरोध करायला सुरूवात केली.

याविरोधात दीपिकाच्या चाहत्यांनी आवाज उठवत, लव रंजनसोबत तू काम करू नकोस, असा सल्ला देण्यास सुरूवात केली आणि नॉट माय दीपिका ट्रेंड ट्विटरवर सुरू झाला. सामाजिक विषयांवर दीपिका अनेकदा भाष्य करत असते. यासोबतच लैंगिक शोषणाविरोधातही ती आवाज उठवत असते. अशात ती लव रंजनसोबत काम कसं करू शकते, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला आहे.

Leave a Comment