‘मिशन मंगल’मधील अक्षयाच्या डायलॉगची सोशल मीडियावर क्रेझ


लवकरच मिशन मंगल चित्रपटाद्वारे बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वीच भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात आला होता. प्रेक्षकांशिवाय इस्त्रोचीही ज्याला पसंती मिळाल्यानंतर सोशल मीडियावर आता अक्षयच्या या चित्रपटातील डायलॉगचीही क्रेझ पाहायला मिळत आहे.


ट्रेलरमधील अक्षयच्या एका डायलॉगचा राजस्थान आणि मुंबई पोलिसांनीही वापर करत वाहतूकीचे नियम सांगितले आहे. एक ट्विट राजस्थान पोलिसांनी शेअर केले आहे. त्यांनी ज्यात म्हटले आहे, वाहन चालवताना हेल्मेट घाला, सीटबेल्ट लावा आणि वाहतूकीच्या नियमांचे पालन करा. पण चित्रपटातील डायलॉगमध्ये अक्षय कुमार म्हणतो, सगळ्या जगाला सांगा, हे कॉपी करा, असे ट्विट करत अक्षयचा पुरी दुनिया को कहो, कॉपी दॅट हा डायलॉग आणि त्याचा फोटो पोलिसांनी शेअर केला आहे.


तर नशेत गाडी चालवू नये, असा संदेश देत अक्षयच्या मिशन मंगलचा एक डायलॉग मुंबई पोलिसांनीही ट्विट केला आहे. हे ट्विट अक्षयने स्वतः आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केले आहेत. दरम्यान हा चित्रपट स्वातंत्र्यदिनी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, विद्या बालन आणि शरमन जोशी या कलाकारांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

Leave a Comment