‘सत्ते पे सत्ता’च्या रिमेकमध्ये ही व्यक्तिरेखा साकारणार कतरिना?


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला ‘सत्ते पे सत्ता’ या १९८२ मध्ये आलेल्या सुपरहिट चित्रपटाचा रिमेक येणार असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आल्यानंतर अमिताभ आणि हेमा मालिनी यांनी मूळ चित्रपटात साकारलेली पात्र या रिमेकमध्ये कोण साकारणार? याबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

अमिताभ यांच्या जागी या चित्रपटात अभिनेता हृतिक रोशन झळकणार आहे, तर दीपिका पादुकोणची वर्णी त्याच्या अपोझिट लागली असल्याचे म्हटले जात होते. पण नुकतेच समोर आलेल्या माहितीनुसार आता या जागी कतरिना कैफची चित्रपट निर्मात्यांनी निवड केली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या रोलसाठी अनेक अभिनेत्रींचा चित्रपट निर्मात्यांनी विचार केला होता. ज्यानंतर कतरिनाच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. दरम्यान याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही. फराह खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून रोहित शेट्टीची निर्मिती असणार आहे.