
इस्लामाबाद – पाकिस्तान सरकारने २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाफिज सईदला अटक केली आहे. हे भारताच्या दहशतवादी विरोधी लढ्याचे मोठे यश समजले जात आहे. जमात-उद-दवा या दहशतवादी संघटनेचा हाफिज सईद प्रमुख आहे. अटक करुन हाफिजला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
पाकिस्तानात हाफिज सईदला अटक
सईदच्या अटकेवर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तान हाफिज सईदला अटक करुन सर्व जगाला मुर्ख बनवत आहे. न्यायालयामध्ये सईद विरुद्ध पाकिस्तान कसे पुरावे सादर करतो, तसेच त्याला दोषी ठरवण्यासाठी किती प्रयत्न करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरेल, अन्यथा सईदला अटक करणे हे पाकिस्तानचे एक नाटक ठरेल, असे निकम म्हणाले.
