म्हातारपणी असे दिसतील तुमचे लाडके क्रिकेटपटू


साखळी सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील सर्वच सामने रोमांचक झाले. दरम्यान जगज्जेता होण्याचा मान यजमान इंग्लंडने मिळवला. पण, हा वर्ल्ड कप आयसीसीच्या नियमांमुळे अजूनही गाजत आहे. पण सोशल मीडियावर सध्या वर्ल्ड कप गाजवणाऱ्या या खेळाडूंचे चेहरे व्हायरल होत आहेत. तुम्हालाही ते चेहरे पाहून धक्का बसेल.

म्हातारपणातील भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा हा लुक पाहून तुम्हाला धक्का बसेल.

म्हातारपणात वर्ल्ड कप गाजवणारा हिटमॅन अर्थात रोहित शर्मा असा दिसेल.

सोशल मीडियावर हिटमॅन रोहित शर्मा आणि फिरकीपटू युजवेंद्र चहल यांचा हा फोटो व्हायरल होत आहे.

वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये भारताच्या आशा जिवंत ठेवणारे महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा यांचा हा म्हातारपणातील फोटो पाहून धक्का बसेल.

भारतीय संघाचा यष्टिरक्षक आणि फलंदाज दिनेश कार्तिक त्याचबरोबर जलदगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याचा हा म्हातारपणातील फोटो.

म्हातारपणात भारताचा हुकूमी एक्का आणि यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह असा दिसेल.

या फोटोमध्ये भारताचा फिनीशर हार्दिक पांड्या याला ओळखणेही कठिण आहे.

म्हातारपणात इंग्लंडला वर्ल्ड कप जिंकवून देणारा आणि अंतिम सामन्यात 87 धावांची खेळी करणारा बेन स्टोक असा दिसेल.

न्यूझीलंडला वर्ल्ड कपच्या सुपर ओव्हरमध्ये आपल्या गोलंदाजीच्या भेदक माऱ्यापुढे टिकाव न धरू देणारा जोफ्रा आर्चर म्हातारपणात असा दिसेल.

न्यूझीलंडचा कर्णधार आणि कॅप्टन सुपरकुल असा ओळखला जाणारा केन विल्यम्सनला यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. अशा या केनचा म्हातारपणातील फोटो व्हायरल होत आहे.

युनिवर्सल बॉस या नावाने प्रसिध्द असलेला वेस्ट इंडिजचा तुफानी फलंदाज ख्रिस गेल. त्याचा म्हातारपणातील हा लुक व्हायरल होत आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करणारा श्रीलंकेचा जलद गोलंदाज लसीथ मलिंगा म्हातारपणात असा दिसेल.
सर्व छायाचित्र साभार – Mufaddal Vohra

Leave a Comment