
मुंबई : आपल्या १९८ रुपयांच्या प्लानमध्ये रिलायन्स जिओने बदल केला असल्यामुळे याचा निश्चित फायदा ग्राहकांना होणार आहे. डेटासह अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएस या प्लानमध्ये दिले जाणार आहेत. जिओचे सर्व अॅप्सचे या सर्व प्लानबरोबर फ्री सब्सक्रिप्शन सुद्धा ग्राहकांना मिळणार आहे.
आपल्या १९८ च्या प्लानमध्ये रिलायन्स जिओने केला बदल
१९८ रुपयांच्या प्लानमध्ये रिलायन्स जिओने बदल केल्याप्रमाणे पूर्ण महिनाभर ग्राहकांना मोफत सेवा मिळणार आहे. या ग्राहकांना प्लानमध्ये १.५ जीबी डेटाऐवजी आता २ जीबी डेटा उपलब्ध होणार आहे. १९८ रुपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना आधी दररोज १.५ जीबी डेटा दिला जात होता.
२८ दिवसांची जिओच्या या प्लानची वैधता आहे. अनलिमिटेड व्हाईस कॉलिंग आणि प्रतिदिन १०० एसएमएस दिले जाणार आहे. दरम्यान, ४४९ रुपयांचा रिचार्ज केल्यास त्यांना तीन महिन्यांपर्यंत जिओची सेवा मिळणार आहे. या प्लानची वैधता ९१ दिवसांची आहे. तीन महिन्यात ग्राहकांना दररोज १.५ जीबी डेटा मिळणार आहे. तसेच दररोज १०० एसएमएस फ्री मिळणार आहे.
