
आजकाल आपल्या लूकमुळे जबरदस्त एनर्जी आणि पॉवरफुल परफॉर्मन्स देणारा अभिनेता रणवीर सिंह बराच चर्चेत असतो. तसेच त्याचा हटके लूक सोशल मिडियावरही त्याचे चाहते बरेच पसंत करतात. त्याने नुकतेच ‘फेमिना’ मॅग्झीनसाठी एक भन्नाट फोटोशूट केले आहे. सोशल मिडियावर त्याचा हा हटके लूक खूपच व्हायरल होत आहे.
फेमिनाच्या कव्हर पेजवर झळकला बॉलीवूडचा अवलिया अभिनेता
रणवीरची हेअर स्टाईल आणि लूकमध्ये फेमिना मॅग्झीन वर झळकलेल्या या फोटोत खूपच डॅशिंग दिसत आहे. आपल्या रणवीरने अलीकडेच वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडियावरून ’83 ‘ या चित्रपटातील स्वतःचा लूक शेअर केला आहे. रणवीर यामध्ये भारतीय क्रिकेटची शान म्हणून ख्यात असलेल्या कपिल देव यांच्या लूकमध्ये रणवीर खूपच वेगळा आणि हटके दिसत आहे.
भारतीय क्रिकेट संघाने 1983 साली वर्ल्ड कप जिंकला होता, त्या वेळेसचा इंडियन टीमचा प्रवास 83 या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. रणवीर सिंहसोबत या चित्रपटात दीपिका पादुकोण सुद्धा एक कॅमिओ रोल साकारणार आहे.
