बँक व्यवहारा दरम्यान ही चुक तुम्हाला पडू शकते 10,000 रूपयांना


आता आधार कार्डाचा मोठ्या रक्कमेच्या बँक व्यवहारांमध्ये वापर करण्याची सोय देण्यात आली आहे. पण तुम्ही जर आधार क्रमांक चूकीचा दिल्यास तुमच्याकडून 10,000 रूपयांचा दंड आकारला जाऊ शकतो. यासंदर्भातील वृत्त हिंदुस्थान टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार 1 सप्टेंबर 2019 पासून ही दंडात्मक कारवाई लागू केली जाऊ शकते. चूकीचा आधार कार्ड क्रमांक बँकेच्या मोठ्या रक्कमेच्या व्यवहारामध्ये आढळून आल्यास थेट दंड ठोठावण्याआधी बँक अधिकारी त्याचे म्हणणे ऐकून घेतील.

5 जुलै दिवशी निर्मला सीतारमण यांनी मांडलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2019 मध्ये इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता करदाते पॅन कार्ड ऐवजी आधारकार्ड वापरू शकतात अशी घोषणा केली होती. त्यामुळे ज्यांच्याकडे पॅनकार्ड नाही असे करदात्यांना आधारकार्ड वापरण्याचा दिलासादायक निर्णय भारत सरकारने दिला आहे. तसेच आता पॅन कार्ड मोठ्या रक्कमेच्या व्यवहारामध्येही गरजेचे नसल्यामुळे कलम 272 B मध्येही बदल केले जाणार आहेत. हे कलम नियमभंग करण्यांवर कारवाई बद्दल आहे.

देशामध्ये सध्या 120 कोटी हून अधिक भारतीयांकडे आधारकार्ड आहे. तर 41 कोटी भारतीयांकडे पॅन कार्ड आहे. यापैकी 22 कोटी पॅनकार्ड्स आधार कार्डासोबत लिंक केलेली आहेत.

Leave a Comment