‘बाटला हाऊस’चे पहिले गाणे तुमच्या भेटीला


दरवेळी आपल्या नृत्याने चाहत्यांवर बॉलिवूडची डांसिग क्विन नोरा फतेही भूरळ पाडत असते. तिने मागच्या वर्षी जॉन अब्राहमच्या ‘सत्यमेव जयते’ मध्ये ‘दिलबर’ गाण्याच्या रिमेकमध्ये धमाकेदार डान्स केला होता. आजही या गाण्याची क्रेझ पाहायला मिळते. ती आता पुन्हा एकदा जॉनच्याच ‘बाटला हाऊस’ चित्रपटात ‘साकी साकी’ गाण्याच्या रिक्रिएटेड व्हर्जनमध्ये पाहायला मिळणार आहे. हे गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. दिलबर गाण्यात नोरा फतेहीने आपल्या ‘बेली डान्स’ची छाप पाडली होती. आता तिच्या नृत्याचा अविष्कार ‘साकी’ गाण्यातही पाहायला मिळत आहे. हे गाणे नेहा कक्कर, तुलसी कुमार आणि बी-प्राकने गायले आहे.

या गाण्याचे मुळ व्हर्जन २००४ साली रिलीज झाले होते. हे गाणे कोयना मित्रा या गायिकेने गायले होते. या गाण्याच्या रिक्रियेटेड व्हर्जनवर तिनेदेखील प्रतिक्रिया दिली आहे. तिने ट्विट करत म्हटले, की हे रिक्रियेटेड व्हर्जन आपल्याला आवडले नाही. हे गाणे बाटला हाऊसमध्ये घेण्याची काय गरज होती, असा प्रश्नही तिने विचारला तिच्या ट्विटमध्ये विचारला आहे. तसेच नोराच्या डान्सची प्रशंसाही तिने केली आहे.


बिग बॉस सीझन ९ पासून नोरा फार चर्चेत आली होती. तिने या शोमध्येच तिच्या नृत्याविष्काराची झलक दाखवून दिली होती. पुढे तिला ‘सत्यमेव जयते’ चित्रपटात ब्रेक मिळाला. ‘दिलबर’ गाण्यामुळेती खूप प्रसिद्ध झाली. ती वरुण धवन, श्रद्धा कपूरसोबत ‘स्ट्रिट डान्सर’ या चित्रपटातही झळकणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग अलिकडेच पूर्ण झाले आहे. त्यापुर्वी ‘बाटला हाऊस’ हा चित्रपट १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.