
प्रिती आणि कबीरची लव्हस्टोरी बॉक्स ऑफिसवर चांगलीच रंगली असून दिवसेंदिवस अभिनेता शाहिद कपूर आणि कियारा आडवाणी यांच्या ‘कबीर सिंह’ची क्रेझ वाढत असल्याचे चित्र सध्या सगळीकडेच पाहायला मिळत आहे. कबीर सिंहने यावर्षीच्या टॉप पाच चित्रपटांमध्ये स्थान मिळवले आहे. तसेच या चित्रपटाने 225 कोटीपेक्षा जास्त कमाईदेखील केली आहे. शाहिद कपूरनेही या चित्रपटाच्या यशामुळे त्याच्या मानधनात कोट्यवधींची वाढ केली आहे.
‘कबीर सिंह’नंतर शाहिदचा भाव वधरला
शाहिदने आगामी चित्रपटासाठी तब्बल 35 कोटी रुपये मानधन मागितले असल्याचे सांगण्यात येत आहे. शाहिदकडे कबीर सिंहच्या यशानंतर बऱ्याच चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. तो आणखी एका दाक्षिणात्य चित्रपटाच्या रिमेकमध्ये भूमिका साकारणार आहे. त्यामुळे शाहिदचा भाव वधरला आहे.
तीन आठवडे ‘कबीर सिंह’ने बॉक्स ऑफिसवर राज्य गाजवले असून चित्रपटाची कमाई अजुनही सुरूच आहे. बऱ्याच टीका, समीक्षानंतरही चित्रपटाच्या कमाईत भर पडत असल्यामुळे तरुणाईवर ‘कबीर सिंह’ची छाप चांगलीच पडली असल्याचे पाहायला मिळत आहे.
