युवराजच्या वडीलांची धोनीवर जहरी टीका


नवी दिल्ली – टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर भारताचा माजी धडाकेबाज क्रिकेटपटू युवराज सिंह याचे वडिल योगीराज सिंह यांनी पुन्हा एकदा कडाडून टीका केली आहे. अंबाती रायडू यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर बोलताना त्यांनी निवड समितीसह धोनीला धारेवर धरले.

अनेक वेळा महेंद्र सिंह धोनीवर योगीराज सिंह यांनी जहरी टीका केली आहे. अंबाती रायडूच्या निवृत्ती निर्णयावर बोलताना त्यांनी पुन्हा एकदा धोनीवर टीकास्त्र सोडते. यावर ते म्हणतात की, अचानकपणे अंबाती रायडूने निवृत्ती जाहीर केली. हे ऐकून मला धक्का बसला. रायडू हा प्रतिभावंत खेळाडू असून निवड समितीच्या निर्णयाचा त्याला फटका बसला असल्याचे योगिराज सिंह म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, एक दिवस धोनीसारखी घाण साफ होणार आहे. निवड समितीमध्ये कधी ना कधी चांगले लोक येतील, चांगला कर्णधार येईल. तू हरु नकोस रायडू निवृत्तीचा निर्णय माघारी घे आणि पुन्हा मैदानात उतर आणि चांगला खेळ करुन तुझी प्रतिभा दाखवून दे, असे त्यांनी सांगितले.

७ नवखे खेळाडू सौरव गांगुली कर्णधार असताना होते. असे असतानाही, चांगल्या पध्दतीने गांगुलीने संघ हाताळला. संघाला उभारणी देणारा कर्णधार हवा, ते काम गांगुली विराटने केले असल्याचेही योगीराज म्हणाले.

Leave a Comment