हटके पद्धतीने सोनू सुदने पूर्ण केले ‘बॉटल कॅप चॅलेंज’


सध्या सोशल मीडियावर ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची क्रेझ पाहायला मिळत आहे. आपल्या स्टाईलने हे चॅलेंज बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी स्विकारून ते पूर्ण देखील केले आहे. हे चॅलेंज अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सुष्मिता सेन, सुनील ग्रोवर, कुणाल खेमू आणि इतर बऱ्याच कलाकारांनी पूर्ण केले आहे. त्याचबरोबर या चॅलेंजमध्ये मराठी कलाकारही मागे राहिलेले नाही. आता हे चॅलेंज अभिनेता सोनू सुदनेही स्विकारून ते हटके पद्धतीने पूर्ण केले आहे. सध्या सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.


सोनूने शेअर केलेल्या व्हिडिओत तो व्यायाम करताना हवेत चालण्याची अॅक्टिंग करताना दिसत आहे. तो हवेत चालता चालता बॉटलचे झाकण उघडतो. सोनूची ही हटके स्टाईल पाहायला जेवढी सोपी आहे, तेवढीच ती करणे अवघड असल्याचे त्याने म्हटले आहे. प्रचंड लवचिकता आणि व्यायामामध्ये सातत्य त्यासाठी असणे गरजेचे असल्याचेही त्याने म्हटले आहे. चाहत्यांच्या सोनूच्या या व्हिडिओवर भरभरुन प्रतिक्रिया येत आहेत.

Leave a Comment