बॉक्स ऑफिसवर सलमानच्या भारतची डबल सेंच्युरी


या रमजान ईदला बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान हा ‘भारत’ चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला. प्रेक्षकांनीही भाईजानची ही भेटवस्तू मोठ्या आवडीने स्वीकारत त्याच्या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले. भाईजानच्या या चित्रपटाने केवळ चार दिवसांतच सेंच्युरी ठोकली होती.

अशात आता या चित्रपटाने डबल सेंच्युरी करत २०१ कोटींचा गल्ला जमावला आहे. चित्रपटाच्या कलेक्शनबद्दलची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत दिली आहे. अनेक नवे विक्रम सलमानच्या या चित्रपटाने रचले आहेत.


अली अब्बास जफरद्वारा दिग्दर्शित ‘भारत’ चित्रपटात सलमानच्या अपोझिट अभिनेत्री कॅटरिना कैफने भूमिका साकारली आहे. तर सलमानच्या पहिल्या गर्लफ्रेंडच्या भूमिकेत चित्रपटात दिशा पटनी पाहायला मिळते. या चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर पुढील ईदला सलमानचा ‘ईन्शाअल्लाह’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून संजय लिला भन्साळी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत.

Leave a Comment