अभिनेत्री क्रिती सेनॉनने ‘हिरोपंती’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. नुकतीच ती कार्तिक आर्यनसोबत लुका-छुपी चित्रपटात झळकली होती. आता ती लवकरच एका नव्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाली आहे. या चित्रपटाबद्दलची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विट शेअर करत दिली आहे.
राहूल ढोलकियाच्या आगामी चित्रपटात झळकणार क्रिती सेनॉन
IT'S OFFICIAL… Kriti Sanon to to play the lead protagonist in #Raees director Rahul Dholakia's new film [not titled yet]… Will be shot in a start-to-finish schedule from Aug 2019… Written by Bilal Siddiqi… Produced by Sunir Kheterpal… Rahul is co-producing also.
— taran adarsh (@taran_adarsh) June 19, 2019
या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘रईस’ चित्रपटाचे दिग्दर्शक राहूल ढोलकिया करणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणाला येत्या ऑगस्ट महिन्यात सुरूवात होणार असून अद्याप चित्रपटाचे शीर्षक निश्चित झाले नाही. या चित्रपटाची कथा बिलाल सिद्दीकी यांनी लिहिली आहे.
त्याचबरोबर अद्याप चित्रपटातील इतर कलाकारांची नावे समोर आलेली नाही. लुका छुपी आणि बरेली की बर्फी यांसारख्या हिट चित्रपटांनंतर आता या महिला केंद्रीत थ्रिलर चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी उत्सुक असल्याचे क्रितीने म्हटले आहे. दरम्यान याशिवाय क्रिती ‘अर्जून पटियाला’, ‘पानिपत’ आणि ‘हाऊसफुल्ल ४’ या चित्रपटांतूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.