चक्क बिग बींच्या या गाण्यावर थिरकली प्रियंका चोप्रा


आतंरराष्ट्रीय स्तरावर आपल्या अभिनयाची दखल घ्यायला लावणारी अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या आपल्या पतीसोबत न्यूयॉर्कमध्ये वास्तव्यास आहे. पण देश सोडून परदेशात राहत असलेली प्रियंका आपला देसी अंदाज विसरेलली नाही. सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ती चक्क बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या सोना-सोना गाण्यावर थिरकत असल्याचे या व्हिडीओत दिसत आहे.


प्रियंका व्हायरल व्हिडिओत निक जोनासच्या मॅनेजरची मुलगी एवा ड्रयू हिच्यासोबत देसी गाण्यावर नाचताना दिसत आहे. हा व्हिडिओ प्रियंकाने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने एवा ड्रयू हिच्यासोबत एक खास संध्याकाळ, असे लिहिले आहे. लाखाहून अधिक व्ह्यूज या व्हिडिओला मिळाले आहेत. प्रियंकाचा देसी अंदाज लोकांना प्रचंड आवडलेला दिसतो.

Leave a Comment