
नवी दिल्ली – अफगाणिस्तान संघाचा स्फोटक फलंदाज मोहम्मद शहजाद हा दुखापतीमुळे विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला असून नुकताच त्याने याबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. मी फिट असतानाही मला अनफिट दाखवून संघातून जबरदस्तीने बाहेर काढल्याचा आरोप त्याने केला आहे. शहजाद विश्वचषक स्पर्धेमधून बाहेर काढल्यामुळे ढसाढसा रडल्याचा फोटो व्हायरल झाला आहे.

याबाबत यष्टीरक्षक फलंदाज शहजाद म्हणतो, की माझ्या गुडघ्याची दुखापत जुनी होती आणि मी त्यातून जवळपास फिटसुद्धा झालो होतो. थोडीशी विश्रांती घेतल्यावर मला सर्व ठिक होईल असे, फिजीओने सांगितले होते. पण टीम व्यवस्थापकाने नेट्समध्ये सराव करत असताना अचानक मला बोलावले आणि सांगितले की तू फिट नाहीस. तुला परत जावे लागेल, असे सांगून बोर्डाने मला जबरदस्तीने बाहेर काढले.
विश्वचषकातून बाहेर फेकला गेल्यानंतर शहजादचा धक्कादायक खुलासा
अफगाणिस्तानचा संघ विश्वचषक स्पर्धेत तीन सामने खेळला असून त्यांना सर्वच सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आहे. मोहम्मद शहजादच्या जागी अफगाणिस्तानच्या संघात इकराम अली खिलचा समावेश केला आहे.
