
हैदराबाद – एमआयएम पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवैसी यांची प्रकृती खालावली असून अकबरुद्दीन यांच्यावर लंडनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकबरुद्दीन ओवैसींची प्रकृती खालावली
त्यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खराब होती. ते यासाठी लंडनला उपचार घेण्यासाठी गेले आहेत. पण त्यांची प्रकृती उपचारादरम्यान खालावत चालली आहे. अकबरुद्दीन यांचे मोठे भाऊ असुद्दीन यांनी याबाबत सांगताना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे. असुद्दीन ओवैसी यांनी ही माहिती ईद मिलाप या कार्यक्रमाप्रसंगी दिली.
हैदराबाद शहरातील अकबरुद्दीन ओवैसी आमदार आहेत. मागील काही वर्षापासून अकबरुद्दीन यांच्यावर चंद्रागुगट्टू येथे उपचार करण्यात येत होते. पण ते चांगल्या उपचारासाठी लंडनला रवाना झाले.
