भारताची पाकला मोदींचे विमान पाक हद्दीतून जाण्यासाठी विनंती


नवी दिल्ली – पाकिस्तान हद्दीतून पंतप्रधान मोदींचे विमान जाऊ देण्याची विनंती भारताने केली आहे. नरेंद्र मोदी किर्गिस्तानातील बिश्केक येथे १३ आणि १४ जून रोजी शांघाय सहकार संघटन परिषेदेच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी जाणार आहेत. ही विनंती त्यापार्श्वभूमिवर करण्यात आली.

भारतीय हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोट येथे जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळावर एरिअल स्ट्राईक केला होता. पाकिस्तान सरकारने त्यामुळे भारतासाठी २६ फेब्रुवारीपासून आपले हवाई क्षेत्र पूर्णत: बंद केले आहे. पाकिस्तानने त्यानंतर त्यांच्या हवाई क्षेत्रातून जाणाऱ्या ११ वायूमार्गांपैकी दोन वायूमार्ग खुले केले आहेत. पण पाकिस्तानच्या दक्षिण भागातून ते जातात. यासंदर्भात केंद्र सरकारच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याने दिेलेल्या माहितीनुसार आम्ही पाकिस्तानला पंतप्रधान मोदींचे विमान पाकिस्तानच्या एका वायूमार्गावरून जाऊ देण्याची विनंती केली आहे. भारतासाठी जो वायूमार्ग अजून खुला करण्यात आलेला नाही. १३ आणि १४ रोजी एससीओच्या शिखर संमेलनाला जाण्यासाठी मोदींना तो एकमेव वायूमार्ग असल्याचे ते यावेळी म्हणाले.

भारताच्या तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज या २१ मे रोजी किर्गिस्तान येथे बिश्केक येथील शांघाय सहकार संघटन परिषेदेच्या शिखर संमेलनात भाग घेण्यासाठी गेल्या होत्या. पाकिस्ताने तेव्हा त्यांच्या हवाई क्षेत्रातून स्वराज यांचे विमान जाण्यासाठी विशेष परवानगी दिली होती. पण मोदींच्या विमानाला आता पाकिस्तान परवानगी देणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दक्षिण पाकिस्तानातील २ वायूमार्ग खुले केले असले तरी इतर वायूमार्ग भारतातील विमानांसाठी अद्याप बंदच ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment