…म्हणून तब्बल ४५ एचआयव्हीग्रस्त मुलांचा पिता झाला अप्पा


चेन्नई – घरच्यांनी सोडून दिलेल्या एचआयव्हीग्रस्त मुलांना निवारा देत शहरातील ‘शेल्टर ट्रस्ट’ या संस्थेने आदर्श निर्माण केला आहे. ४५ एचआयव्हीग्रस्त मुलांना सोलोमन राज (अप्पा) यांनी दत्तक घेतले आहे.

‘शेल्टर ट्रस्ट’ उपक्रमाबाबत सोलोमन राज यांनी सांगितले की, मला चांगले काम केल्यामुळे समाधान मिळते. मला ही लहान मुले जेव्हा ‘अप्पा’ म्हणून हाक मारताता, तेव्हा मला जो आनंद मिळतो तो काही वेगळाच असतो. आम्हाला लग्न झाल्यापासून ८ वर्षापर्यंत मुल झाले नव्हते. आम्ही त्यामुळे गरजु असलेल्या एचआयव्हीग्रस्त मुलाला दत्तक घ्यायचे ठरवले. पण बायोलॉजिकल मुल आम्हाला झाले. यामुळे, दत्तक मुल घेण्याचा विचार काही काळ बाजूला पडला. पण, एचआयव्हीग्रस्त मुलाला दत्तक घेतले नाही याचा विचार बैचेन करत होता. त्यामुळे मुल दत्तक घेण्याचे मी ठरवले आणि हा उपक्रम असाच चालू आहे.

मी सध्या ४५ एचआयव्हीग्रस्त मुलांचा वडील आहे. मला यासाठी खूप आर्थिक अडचणी आहेत. त्यांचे शिक्षण आणि आरोग्यावर यामध्ये मोठा खर्च होतो. त्यांची तब्येत खराब असते. कधीही ते आजारी पडतात. पण मला त्यांनी अप्पा म्हणून हाक मारल्यानंतर समाधान मिळते.

या मुलांना शेल्टर ट्रस्टद्वारे प्रत्येक सुविधा पुरवली जाते. शिक्षण, वैद्यकीय सुविधा, खेळणी, कला, डान्स आणि कॉम्प्युटरचे ज्ञान यामध्ये दिले जाते. या मुलांपैकी काहीजणांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. अकरावीत शिकणारी मुलगी म्हणाली, मी येथे २०१६ साली आले. मला डॉक्टर व्हायचे आहे. एचआयव्हीग्रस्त मुले इतर मुलांपेक्षा कमी नाहीत हे मला दाखवून द्यायचे आहे.

Leave a Comment