
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या व्यवसायने बँकर आणि गायिका असून सध्या त्यांच्या लॉस एन्जेलिस आणि कॅलिफोर्नियातील म्युझिकल कॉन्सर्टला तुफान प्रतिसाद मिळत आहे. लॉस एन्जेलिसमध्ये एका कॉन्सर्टसाठी अमृता फडणवीस गेल्या आहेत. अमृता फडणवीस या सोशल मीडियावर बऱ्याचदा अॅक्टिव्ह असतात. त्यांनी फोटोसहीत आपल्या फॅन्ससोबत आपल्या या कार्यक्रमाचा आनंद शेअर केला आहे.
फडणवीसांच्या सौभाग्यवतींचा अमेरिकेतील कॉन्सर्टमध्ये ‘रॉकस्टार’ अवतार!
या चॅरिटी म्युझिकल शोचे नाव ‘जय हो’ असे असून त्याला रसिकांची चांगलीच दाद मिळत असल्याचे त्यांनी सोशल मीडियावरुन सांगितले. या शोचे आयोजन अमेरिकन असोसिएशन ऑफ फिजिशिअन्स ऑफ इंडियन ओरिजिन’ यांनी केले होते.

हा चॅरिटी शो हृदयविकार, ल्युकेमिया आणि संदर्भातील आजार असलेल्या भारतातील आणि अमेरिकेतील रूग्णांच्या मदतीसाठी आयोजित करण्यात आला होता.

अमृता फडणवीस यांचा या शोमध्ये सहभाग होता. या शोमध्ये सहभागी होऊन आपल्याला खूपच आनंद झाला अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी इन्स्टाग्रामवर लिहिली असून त्यासोबतच या कार्यक्रमातील काही फोटोही शेअर केले आहेत.
