प्रियंका चोप्राचा वेस्टर्न लुकला देसी टच


सध्या मुंबई दौऱ्यावर बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा असून नुकतेच तिला एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. प्रियंका यावेळी फार कॅज्युअल लुकमध्ये दिसली. यावेळी तिने डेनिम जॅकेट आणि ट्राउझर घातली होती.


जरी वेस्टर्न लुकला प्रियंकाने प्राधान्य दिले असले तरी यावर तिने स्वतःचा देसी टचही दिला होता. तिने डेनिम जॅकेटवर मंगळसूत्र घातले होते. सध्या सोशल मीडियावर प्रियंकाचे हे नवे फोटो ट्रेण्ड करत आहेत. यावेळी तिने चश्मा लावला होता.

View this post on Instagram

🧡 #Cannes2019

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on


मुंबईत प्रियंका कामानिमित्त आली असून तिच्या आगामी स्काय इज पिंक या चित्रपटातील एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी ती आली आहे. यासंदर्भात मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार, गाणे प्रीतमने हे संगीतबद्ध केले असून हे गाणे गुलजार यांनी लिहिले आहे. नुकतेच एका मासिकासाठी प्रियंकाने फोटोशूट केले. तिचं हे साडीतील फोटोशूट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.


प्रियंकाला यासाठी ट्रोलही करण्यात आले. तिला अनेकांनी भारतीय संस्कृतीच्या हे विरुद्ध असल्याचेही म्हटले. स्काय इज पिंक चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर सोनाली बोस दिग्दर्शित या चित्रपटात प्रियंकासोबत फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांची महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

Leave a Comment