इम्तियाज अलीच्या आगामी चित्रपटात झळकणार रणदीप हुडा


अभिनेता रणदीप हुडा दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटात काम करत आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून इम्तियाजसाठी एक संदेश रणदीपने दिला आहे.

इम्तियाज अली यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले आहे. त्यांच्यासोबत हायवे चित्रपटानंतर ५ वर्षांनी काम करीत असताना नेहमी सारखाच अप्रतिम अनुभव होता. कामाचा आनंद अमर्याद होता. एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून नव्याने स्वतःला शोधता आले. त्यांच्या टीमला भावी कार्यासाठी शुभेच्छा देतो, असे रणदीप हुडाने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. शेअर केलेल्या फोटोत इम्तियाज अली यांच्या खांद्यावर रणदीपने हात ठेवला आहे. दोघांच्याही चेहऱ्यावरील हास्य त्यांच्यातील मैत्रीचे दर्शन घडवते. इम्तियाज अली यांच्या ज्या चित्रपटाचे शूटींग पूर्ण झाले त्याचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. यात रणदीपसोबत सारा अली खान आणि कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत आहेत.