कियारा-शाहिदच्या ‘कबीर सिंह’चे तिसरे गाणे रिलीज


शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी अभिनीत कबीर सिंह हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यापूर्वी चित्रपटातील ‘बेख्याली’ आणि ‘तुझे कितना चाहने लगे हम’ या गाण्यांना मिळालेल्या प्रतिसादानंतर नुकतेच चित्रपटातील तिसरे गाणे रिलीज करण्यात आले आहे.

शाहिद आणि कियाराची खास लव्ह केमिस्ट्री दोन मिनिटांच्या या गाण्यात पाहायला मिळत आहे. चित्रपटातील आधीच्या दोन्ही भावनिक गाण्यांनंतर आता हे प्रेमगीत रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याला सचेत टंडन यांनी आपल्या आवाजाने अधिक खास बनवले आहे. तर गाण्याची मांडणी सचेत आणि परंपरा यांनीच केली आहे.

‘मेरे सोनेया वे मेरा कैथे नैयो दिल लगदा’, असे शीर्षक असलेल्या या गाण्यात ही जोडी वेगवेगळ्या लोकेशन्सवर क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहेत. कबीर सिंह चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप वंगा रेड्डी हे करणार असून हा दाक्षिणात्य ‘अर्जून रेड्डी’ चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. हा चित्रपट येत्या २१ जूनला रिलीज होणार आहे.

Leave a Comment