
पुणे : गुरुवारी रायगडावर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३४६वा शिवराज्याभिषेक दिन साजरा होणार आहे. या सोहळ्याचे आयोजन अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. हजारो शिवभक्त यासाठी रायगडावर दाखल होत आहेत. विविध मर्दानी खेळ, सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक उपक्रमाचेही यानिमित्ताने आयोजन करण्यात आले आहे.
रायगडावर हजारो शिवभक्तांच्या उपस्थित साजरा होणार ३४६वा शिवराज्याभिषेक सोहळा
दरवर्षी हजारो शिवभक्त रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याला येत असतात. हजारो शिवभक्त यंदाही रायगडावर उपस्थित राहणार आहेत. विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खा. युवराज संभाजी राजे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगडावर संपूर्ण सोहळा होत असतो.
