
वर्ल्ड कपचा फिवर भारतासह जगभरात चढू लागला असून प्रत्येक ब्रांड या लाटेचा फायदा उचलण्यासाठी काही ना काही करत असल्यामुळे काहीतरी वेगळे करण्याचे जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेली कंपनी गुगलनेही ठरविले होते. भारत क्रिकेटसाठीच्या बाजारात पहिला असल्याने भारतीय चाहत्यांसाठी गुगलने कप्तान विराट कोहलीचा व्हिडिओ पाठवला. पण यावरून गुगलला माफी मागावी लागली आहे.
गुगलचा भारतीय क्रिकेट संघावरून माफीनामा
गुगलने हे यंदाचा वर्ल्ड कप सुरु होण्याआधी केले होते. भारतीय चाहत्यांसाठी एक विशेष संदेश गुगलचे व्हिडिओ कॉलिंग अॅप Duo वर पाठविण्यात आला होता. विराट कोहलीने यामध्ये चाहत्यांचे आभार मानले होते. तसेच या व्हिडीओमध्ये टीम इंडियाला पाठिंबा देत रहा असेही म्हटले होते. पण केवळ भारतीय संघाच्या चाहत्यांनाच हा व्हिडीओ पाठवायचा होता. इतर संघांच्या चाहत्यांनाही तो गेल्याने गुगलवर मोठी नामुष्की ओढवली. एका अहवालानुसार अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंडचे चाहते यामुळे खूश नव्हते. त्यांनी गुगलकडे माफी मागावी, अशी मागणी केली होती.
यानुसार आपल्या एका फोरम वेबसाईटवर गुगलने माफी मागितली आहे. गुगलचा एक व्हिडीओ Google Duo च्या काही युजर्सना चुकीने पाठवला गेला. ही जाहीरात नव्हती. हा व्हिडीओ भारतीय युजर्सना पाठवायचा होता. हे Duo चे प्रमोशन करण्याचा एक भाग होता. कोणत्याही प्रकारची भावना दुखावली गेल्यास किंवा गैरसमज निर्माण झाल्या माफी मागतो, असा संदेश लिहिला आहे.
