
लोकसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यंदा लोकसभेत महिला खासदारांची संख्या वाढली आहे. यंदा अनेक फील सितारे निवडणूक रिंगणात होते त्यातील काहींच्या गळ्यात विजय माला पडली तर काहीना पराभवास सामोरे जावे लागले. त्यात यंदा महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून विजयी ठरलेल्या नवनीत रवी राणा यांचे काही फोटो सोशल मिडीयावर आले असून त्यांना लोकांनी संसदेतील सर्वात सुंदर खासदार अशी पसंती दिली आहे.
नवनीत रवी राणा बनल्या संसदेतील सुंदर खासदार
गेल्या निवडणुकीत पराभव स्वीकाराव्या लागलेल्या दक्षिणेकडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नवनीत रवी राणा या वेळी शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांना मागे टाकून निवडून आल्या आहेत. त्या अपक्ष म्हणून निवडून आल्या असून गेल्या वेळी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून निवडणूक लढविली होती. यंदा नवनीत यांना ५,१०,९४७ तर अडसूळ यांना ४,७३,९९६ मते पडली.

नवनीत यांचे पती रवी राणा आमदार आहेत. नवनीत मुळच्या पंजाब मधील असल्या तरी त्यांच्या जन्म आणि शिक्षण मुंबईत झाले आहे. त्यांचे वडील आर्मी ऑफिसर असून नवनीत यांनी मॉडेलिंग केले आहे. त्यानंतर त्या दक्षिणात्य चित्रपटात गेल्या आणि लोकप्रिय अभिनेत्री बनल्या. राणा याच्याशी विवाह झाल्यावर मात्र त्यांनी राजकारणात प्रवेश केला. रवी राणा अमरावतीच्या बडनेरा मधून आमदार म्हणून निवडून आले असून या दोघांचा विवाह सार्वजनिक विवाह सोहळ्यात अन्य ३७०० जोडप्यांसह झाला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, योगगुरू रामदेव बाबा आवर्जून उपस्थित होते.
