स्विगी आणि राष्ट्रपतींचे प्रेस सचिव मलिक


देशभारत ऑनलाईन फूड डिलिव्हरी देणाऱ्या कंपन्या चांगला व्यवसाय करत आहेत. विशेषतः शहरी भागातील नागरिकांना या सेवा म्हणजे मोठीच सोय असली तर अनेकदा या सेवांमुळे अडचणही सोसावी लागते याचा अनुभव अनेकांना येत असतो. त्यातही ऑर्डर करूनही जेव्हा खाद्यपदार्थ येत नाहीत तेव्हा होणारी गोची वेगळीच असते. अर्थात सर्वसामान्य माणूसच अश्या गोचीला समोरा जातो असे नाही तर महत्वाच्या किंवा उच्च पदावरील लोकही याचा अनुभव घेतात हे नुकतेच एका ट्विट वरून उघड झाले.


हे ट्विट दुसरे तिसरे कुणी नाही तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या प्रेस सचिवानी म्हणजे अशोक मलिक यांनी केले होते आणि त्यावर आलेल्या उत्तरांनी चांगलेच मनोरंजनही केले. झाले असे की, रविवारी मलिक यांनी स्वीगीवरून काही खाद्यपदार्थ ऑर्डर केले आणि डिलिव्हरी न देताच खाद्यपदार्थ डिलिव्हर झाल्याचा मेसेज त्याना आला. त्यावर त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकौंटवरून स्वीगी इंडिया आणि स्वीगी केअर यांना टॅग करून मागविलेले खाद्यपदार्थ डिलिव्हर झाले नसून संबंधित डिलिव्हरी बॉयचा फोन स्वीच ऑफ येत असल्याचे लिहिले मात्र लगोलग इंटरनेट वरून दुसऱ्याच युजरने अॅट डॉविशाल नावाने मलिक यांना राष्ट्रपती आज काय खाणार असा प्रश्न केला.

त्यावर मलिक यांनी दिलेले उत्तर पाहता पाहता सोशल मिडीयावर व्हायरल झाले. मलिक यांनी लिहिले होते, राष्ट्रपती क्या खायेंगे ये तो पता है लेकीन अभी तो बच्चे मेरा सर खा रहे है, स्विगीने आणखी उशीर केला तर ती बिचारी भुकेने कासावीस होतील. या उत्तरावर सोशल मिडिया युजर एकदम खुश झाले. दरम्यान स्विगी केअरने तुमची समस्या कळली, लवकरच ती सुटेल असे कळविले. मलिक यांची १ ऑगस्ट २०१७ रोजी राष्ट्रपतींचे प्रेस सचिव म्हणून नियुक्ती झाली असून सिव्हील सर्विसेस मधून न आलेले ते पहिलेच प्रेस सचिव आहेत.

Leave a Comment