या अभिनेत्याच्या बायकोचा फोटो करण जोहरच्या बेडरूममध्ये


करण जोहरसारखे प्रसिद्ध आणि यशस्वी व्हावे असे आज प्रत्येक होतकरु दिग्दर्शक आणि निर्मात्याला वाटत असते. पण एका महिलेचा करण जोहरच्या या यशामागे फार मोठा हात आहे. आता त्याची आई हिरू जोहरबद्दल आम्ही बोलत आहे असे वाटत असेल पण असा काही गैरसमज करुन घेऊ नका. करणच्या यशामागे जी महिला आहे ती दुसरी कोणी नसून बॉलिवूडचा बादशहा शाहरुखची बायको गौरी खान आहे.

आपल्या बेडरूममध्ये चक्क गौरीचा फोटो करणने लावला आहे. करणने एका मुलाखतीत गौरीसोबत असलेल्या मैत्रीबद्दल सांगितले होते. करण म्हणाला की, त्याच्या आयुष्यातील शाहरुख आणि गौरी हे फार महत्त्वपूर्ण व्यक्ती आहेत. गौरी आणि त्याचे नाते यातही फार खास आहे. ज्या पद्धतीने संपूर्ण घर आणि काम गौरी सांभाळते ते फार कौतुकास्पद आहे. करण पुढे म्हणाला की, आई-वडिलांशिवाय शाहरुख आणि गौरीचाही एक फोटो त्याच्या बेडरूममध्ये आहे.

शाहरूख आणि गौरीला करण त्यांच्या कॉलेज दिवसांपासून ओळखतो आणि सिनेसृष्टीत एवढी वर्ष एकत्र घालवल्यानंतर तिघे एकमेकांना फार चांगल्या पद्धतीने ओळखतात. दरम्यान, करण आणि शाहरुखमध्ये काही दिवसांपूर्वी विस्तव जात नसल्याच्या अफवा समोर आल्या होत्या. पण तिघांच्या मैत्रीत या सगळ्यात फारसा फरक पडला नाही.

Leave a Comment