
नवी दिल्ली – भारतात चीनसह इतर देशांनी गुंतवणूक करून रोजगार निर्मिती करावा, यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न केले जात असले तरी भारतासह विदेशातही रोजगार निर्मिती करून ओयो या स्टार्टअपने दाखविला आहे. ओयोचा चीनमधील ३२० शहरांत गेल्या १८ महिन्यात विस्तार झाला असल्यामुळे ओयो कंपनीने १ लाख जणांना रोजगार मिळाल्याचे म्हटले आहे.
चीनमधील १ लाख जणांना रोजगार देत आहे ‘ही’ भारतीय कंपनी
चीनमधील ३२० शहरातील १० हजार नामांकित हॉटलमध्ये ऑनलाईन रुम बुक करण्याची सुविधा ओयो ही नागरिकांना देते. ओयो चीनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर सॅश शिआह कंपनीच्या यशाबद्दल बोलताना म्हणाले, ओयो जिवूद्दीन (हॉटेल) हे चीनी कंपनीसारखे चालविण्यात येते. मध्यम उत्पन्न असलेल्यांना त्यातून चांगल्या राहणीमानाचा अनुभव घेता येतो. ओयोमधील हॉटेलचे दर कमी असल्याने २० हजार जण रोज बुकिंग करतात. त्यातून चीनमध्ये आणखी रोजगार निर्माण होणार आहे. तसेच नव्या आर्थिक संधी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
