‘पुमा’कडून विराटला विश्वचषक स्पर्धेसाठी स्पेशल गिफ्ट


मुंबई : इंग्लंडमध्ये येत्या 30 तारखेपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला या विश्वचषकासाठी पुमा (PUMA) कंपनीने स्पेशल गिफ्ट दिले आहे. स्पेशल अॅडिशन शूज पुमा या प्रसिद्ध स्पोर्ट्स ब्रँडद्वारे डिझाईन करण्यात आले आहेत. जगभरात या ब्रँडचे केवळ 150 शूज उपलब्ध असणार आहेत.

त्यांनी विराटला दिलेल्या या शूजसोबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी या व्हिडीओमध्ये पुमा कंपनीच्या या शूजची माहिती दिली आहे.


पुमा कंपनीने तयार केलेल्या या शूजचे नाव वन-8 असे आहे. हे शूज पांढऱ्या रंगाचे असून त्याला गोल्डन रंगाची स्पाईक देण्यात आली आहे. हे पुमा कंपनीचे स्पेशल अॅडिशन शूज आहेत. याचे फक्त 150 शूज बनवण्यात येणार आहे. त्यामुळे हे शूज जगभरातील केवळ 150 लोकांकडेच असणार आहे. 19 हजार 999 रुपये एवढी या शूजची किंमत आहे.


येत्या 30 मे पासून क्रिकेट विश्वचषकाची सुरुवात होत आहे. यंदाचा विश्वचषक क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या इंग्लंडमध्ये रंगणार आहे. टीम इंडिया या विश्वचषकासाठी नुकतीच रवाना झाली. विराट कोहलीचा हा तिसरा विश्वचषक असला तरी कर्णधार म्हणून तो पहिल्यांदाच जबाबदारी सांभाळणार आहे.

5 जून रोजी टीम इंडियाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेसोबत होणार आहे. यंदाच्या विश्वचषकात विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, एम.एस. धोनी, विजय शंकर, केदार जाधव, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमी या खेळाडूंचा भारतीय टीममध्ये समावेश असणार आहे.

Leave a Comment