४ लाख रुपयांचा मोफत इन्शुरन्स देणार एअरटेल !


नवी दिल्ली : सध्या दूरसंचार क्षेत्रात सुरु असलेल्या स्पर्धेत टिकण्यासाठी सर्व टेलीकॉम कंपन्या रोज नवनव्या ऑफर्स आणत असतात. आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी एक जबरदस्त प्लान एअरटेल कंपनीने लॉन्च केला आहे. मोफत लाइफ इन्शुरन्स २४९ रुपयांच्या प्लानवर देण्यात येत आहे. कंपनीने यासाठी एचडीएफसी लाइफ इन्शुरन्ससोबत करार केला आहे.

यूजर्सना २४९ रुपयांच्या प्लानमध्ये ४ लाख रुपयांचा टर्म इन्शुरन्स मोफत दिला जाणार आहे. तुम्ही हा प्लान जर पहिल्यांदाच खरेदी करत असाल तर SMS द्वारा इन्शुरन्सची सुविधा एनरोल करावी लागेल. त्याशिवाय या सुविधेचा लाभ एअरटेल अॅप किंवा दुकानातूनही घेता येऊ शकतो. दुसऱ्या वेळेस रिचार्ज केल्यानंतर इन्शुरन्स स्वत:च अपडेट होतो. दुसऱ्यांदा त्याला एनरोल करण्याची आवश्यकता नसते. फ्री इन्शुरन्सचा फायदा १८ ते ५४ वर्षांपर्यंतचे यूजर्स घेऊ शकतात. २८ दिवस इतकी या प्लानची वैधता आहे. यूजर्सला या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा मिळणार आहे. त्याशिवाय लोकल, एसटीडी आणि रोमिंग कॉलही मोफत मिळणार आहे. इंन्शुरन्ससाठी कोणत्याही प्रकारच्या पेपर वर्कची आवश्यकता नाही.

त्याशिवाय कंपनी हळू-हळू ४९९ रुपयांपेक्षा कमी असणारे पोस्ट पेड प्लान बंद करणार असल्याचीही माहिती मिळत आहे. २९९ रुपयांचा प्लान कंपनीने बंद केला आहे. त्यानंतर आता कंपनी ३४९ आणि ३९९ रुपयांचा पोस्ट पेड प्लानही रद्द करणार आहे. ४९९ रुपयांपेक्षा अधिक असणाऱ्या प्लानची संख्या कमी होऊन केवळ तीन ७४९ रुपये, ९९९ रुपये आणि १५९९ रुपये ठेवण्यात येणार आहे.

Leave a Comment