स्वस्तात एसी विकणार सरकार, 24 तासात होम डिलीव्हरी


आपण उन्हाळ्यात थंड हवेसाठी एसीला प्राधान्य देतो. पण प्रत्येक व्यक्तीला एसी महाग असल्यामुळे तो परवडत नाही. म्हणून आता लवकरच शासनामार्फत बाजारात स्वस्त एसी उपलब्ध होणार आहेत. सरकार बाजार भावापेक्षा 15 टक्के स्वस्त आणि ब्रँडेड एसी खरेदी करण्याची संधी ग्राहकांना देणार आहे. हा एसी EESL या शासकीय कंपनीद्वारे लॉन्च केला जाईल. तसेच या एसीची किंमत ग्राहकांच्या बजेटमध्ये असून यासाठी अत्यंत कमी वीज लागेल.

आपण ऑनलाईनही हा एसी खरेदी करू शकता किंवा आपण याअंतर्गत एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊ शकता म्हणजे आपला जुना एसी देऊन नवीन एसी आपल्याला घेता येईल. यामुळे एसीमुळे आपल्या वीजबिलात 35 ते 40 टक्के बचत होणार आहे. येणाऱ्या काही दिवसांत शासनाद्वारे ही सुविधा सुरू करण्यात येईल. ग्राहकांनी ऑनलाईन बुकिंग केल्यानंतर 24 तासाच्या आत घरात एसी लावण्याची गॅरंटी कंपनीने दिली आहे. EESL कंपनी यासाठी जुलै महिन्यापासून सामान्य नागरिकांसाठी मार्केट प्लेस लॉन्च करणार आहे.

याबाबत कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, जुलैपर्यंत ग्राहकांना स्वस्त एसी मिळतील. तसेच, पुढील वर्षापर्यंत 2 लाख एसी विक्री करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. पण हा एसी खरेदी करण्यासाठी आपल्याकडे वीज कनेक्शन असणे आवश्यक आहे. यापुर्वीही या कंपनीने कमी किंमतीत अनेक उपकरण उपलब्ध केले आहेत. यामध्ये घरातील स्वस्त एलईडी आणि ट्युबलाईटचा समावेश असल्यामुळे कंपनीने आता घरा-घरात स्वस्त एसी देण्याचा निर्णय घेतला आहे. या कंपनीने स्वस्त ट्यूबलाईट आणि पंखे विक्री करण्याचे काम डिसकॉम (Discom) या कंपनीसोबत मिळून केले होते.

Leave a Comment