
हैदराबाद – महात्मा गांधीचा खून करणाऱ्या नथूराम गोडसे याला कमल हसन यांनी पहिला दहशतवादी असे म्हटले होते. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी यावर भाष्य करताना गांधीजींचा खून करणाऱ्यांना महात्मा म्हणायचे का ? असा सवाल केला आहे.
कमल हसनच्या वक्तव्याचे ओवैसींकडून समर्थन
तामिळनाडूच्या अरावाकुरिची विधानसभा क्षेत्रात आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत कमल हसन यांनी नथूराम गोडसेबद्दल वक्तव्य केले होते. निवडणूक आयोगाकडे या वक्तव्याची तक्रार करणार असल्याचे भाजपने म्हटले आहे.
कमल हसन यांच्या वक्तव्याचे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी समर्थन केले आहे. ते म्हणाले, महात्मा गांधीचा खून ज्याने केला, त्याला महात्मा म्हणणार का ? दहशतवादीच त्याला म्हणावे लागेल. कपूर आयोगाच्या अहवालाने देखिल गोडसेवर असलेल्या आरोपांवर शिक्कामोर्तब केला आहे.
