
नवी दिल्ली – अभिनेता कमल हसन यांच्या विरोधात महात्मा गांधी यांचा खून करणाऱ्या नथूराम गोडसे याला पहिला दहशतवादी म्हटल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तामिळनाडूच्या अरावाकुरिची विधानसभा क्षेत्रात कमल हसन यांनी नथूराम गोडसेबद्दल वक्तव्य केले होते. ते आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या सभेत बोलले होते.
त्या वक्तव्याबद्दल कमल हसन यांच्या विरोधात गुन्हा दाखल
हा गुन्हा दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयात दाखल करण्यात आला आहे. हिंदू धर्मीयांच्या भावना कमल हसन यांनी दुखावल्या आहेत. हिंदू धर्माला त्यांनी दहशतवादाशी संबंध जोडला असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.
